Bandhavgarh National Park
sakal
बांधवगडमध्ये प्रवेश करताच तुम्हाला शेतजमीन आणि सागाच्या घनदाट जंगलाचे दर्शन घडते. हे जंगल केवळ वाघांसाठी प्रसिद्ध नाही, तर इथल्या मातीमध्ये दडलेला इतिहास आणि निसर्गाचे बदलत जाणारे ऋतू पर्यटकांना भुरळ घालतात.
वन्यजीव आणि सफारीचा अनुभव
बांधवगड हे विशेषतः बंगाल टायगरसाठी (Royal Bengal Tiger) जगप्रसिद्ध आहे. चार्जर आणि सीता यांसारख्या दिग्गज वाघांमुळे या उद्यानाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. मात्र, वाघांव्यतिरिक्त येथे बिबट्या, अस्वल (Sloth Bear), रानकुत्रे, रानगवे (Gaur), सांबर आणि चितळ यांसारखे प्राणी मोठ्या संख्येने आढळतात. पक्षीप्रेमींसाठी येथे २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी आहेत.