भागलपूर : बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) सामूहिक बलात्काराची खळबळजनक घटना घडली आहे. कहलगाव ब्लॉक (Kahalgaon Block) परिसरातील एका गावातील तीन मुली दियारा येथे पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. यापैकी एका अल्पवयीन मुलीला काही तरुणांनी आमिष दाखवून एकटं पाडलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या क्रूर कृत्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध झाली होती.