'माझ्यासोबत तुम्हीही शपथ घ्या'; तीन कोटी पंजाबींना भगवंत मान यांची हटके विनंती

Bhagwant Mann
Bhagwant MannEsakal

चंडीगड: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने निर्विवाद बहुमताने आपली सत्ता स्थापन केली आहे. भगवंत मान (Bhagwant Mann) हे पंजाबमध्ये आपच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होते. त्यामुळे ते आता येत्या बुधवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तत्पुर्वी, भगवंत मान यांनी आज सोमवारी "राज्यातील तीन कोटी लोकांसाठी" एक व्हिडिओ ट्विट करुन आवाहन केलंय. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी पंजाबी लोकांना सोबत घेण्याचं आवाहन केलंय. अरविंद केजरीवाल यांनी अमृतसरमध्ये काढलेल्या भव्य अशा विजयी रोड शोचे नेतृत्व केल्यानंतर हा अपील करणारा व्हिडिओ समोर आला आहे.

Bhagwant Mann
संसद सुरू होताच खासदारांच्या 'मोदी मोदी' घोषणा, ओम बिर्ला म्हणाले.. 'झालं का?'

या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलंय की, "16 मार्च रोजी खटकर कलानमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. फक्त मीच नाही तर राज्यातील 3 कोटी लोकसंख्या माझ्यासोबत शपथ घेणार आहे. आम्ही सगळे स्वातंत्र्यसैनिक असलेल्या भगतसिंग यांचा वारसा एकत्रितपणे पुढे नेऊ. मी एकटा शपथ घेणार नाही. तुम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांची शपथ घ्या. हे तुमचे सरकार असेल." खटकर कलान हे भगतसिंग यांचं गाव आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, "तुमच्या भावाला प्रोत्साहन देण्यासाठी कृपया सकाळी 10 वाजता खातकर कलान येथे या," पुढे त्यांनी विनंती केलीय की, महिलांनी भगवे दुपट्टे आणि पुरुषांनी भगवी पगडी घालून यावं. शीख धर्मात केशरी रंगाला महत्त्व आहे. आपण त्या दिवशी खातकर कलान गावाला भगव्या रंगाने रंगवून टाकू, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Bhagwant Mann
IND vs SL Live : तिसऱ्याच दिवशी रोहित सेना लंका दहन करणार?

अरविंद केजरीवाल यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. हिंदीमध्ये त्यांनी लिहलंय की, "पंजाब पुन्हा एकदा रंगीला पंजाब बनेल. भगतसिंग यांची स्वप्नं साकार होतील. संपूर्ण पंजाब माझ्या धाकट्या भावासोबत शपथ घेईल. मी सहभागी होणार आहे... तुम्हीही या... असं आवाहन त्यांनी केलं आहे.

आपने पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये 117 पैकी 92 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयामुळे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला केवळ 18 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. आपच्या या साऱ्या विजयाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपने प्रकाशसिंग बादल, अमरिंदर सिंग आणि चरणजीत सिंग चन्नी यांचादेखील पराभव केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com