esakal | भारत बायोटेक अन्‌ सीरमला केंद्र सरकारकडून निधीची ‘लस’
sakal

बोलून बातमी शोधा

serum institute and bharat biotech

भारत बायोटेक अन्‌ सीरमला केंद्र सरकारकडून निधीची ‘लस’

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - अवघा देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडला असताना केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना साडेचार हजार कोटींचा निधी मंजूर केला. यापैकी सीरमला तीन हजार कोटी तर भारत बायोटेकला दीड हजार कोटींचा निधी दिला जाईल. हा निधी प्रथम कोविडच्या प्रभारी मंत्र्यांकडे दिला जाईल. त्यांच्याकडून जलदगतीने लसनिर्मिती करण्यासाठी या दोन्ही कंपन्यांकडे निधी वर्ग केला जाईल.

केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज या निधीला हिरवा कंदिल दाखविला. ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी लसनिर्मितीचा वेग वाढविण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची विनंती केंद्र सरकारला केली होती. या निधीमुळे जगातील सर्वांत मोठी लस कंपनी असलेल्या सीरमला मे अखेरपर्यंत महिन्याला दहा कोटी लस तयार करणे शक्य होईल. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत पूनावाला म्हणाले होते, की केंद्र सरकार सीरमसारख्या लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीबरोबर काम करत आहे. सरकार कंपनीची क्षमता वाढविण्यासाठी आर्थिक मदतीसह कोणत्या नावीन्यपूर्ण मार्गाचा अवलंब करते, हे पाहावे लागेल.

हेही वाचा: यूपीत कोरोनाचा उद्रेक; योगी सरकार हायकोर्टाचंही ऐकेना

मंजूर निधी (आकडे कोटींत)

सीरम इन्स्टिट्यूट

तीन हजार

भारत बायोटेक

दीड हजार

कोविड व्यवस्थापनाबाबत विविध उद्योजकांशी चर्चा केली आहे. कोरोना काळात नागरिकांचे प्राण व उपजीविका वाचविण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांबरोबर काम करत आहे.

- निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

loading image