Nasal Vaccine : भारत बायोटेक आणणार पहिली नेझल कोविड लस; पण अद्याप 'हा' डेटाच उपलब्ध नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Biotech

Nasal Vaccine : भारत बायोटेक आणणार पहिली नेझल कोविड लस; पण अद्याप 'हा' डेटाच उपलब्ध नाही!

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या सुईमुक्त इंट्रानेसल कोविड लशीला 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननं (CDSCO) या लसीला प्राथमिक शृंखला तसेच हेटरोलॉगस बूस्टर म्हणून वापरण्यासाठी मान्यता दिली आहे. हेटरोलॉगस बूस्टर डोस म्हणजे एखाद्या व्यक्तीनं सुरुवातीला घेतलेल्या दोन लशींच्या डोसपेक्षा वेगळी लस बूस्टर डोस म्हणून दिली जाते. (Bharat Biotech to launch first Nasal Covid Vaccine No Efficacy Data Released)

एका निवेदनात, भारत बायोटेकनं म्हटलं आहे की, इंट्रानेसल लस iNCOVACC क्लिनिकल चाचण्यांदरम्यान सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं आहे. या लसीचा प्राथमिक डोस आणि हेटरोलॉगस बूस्टर डोस म्हणून चाचणी करण्यात आली होती. परंतू, अद्याप याचा कोणताही इफिकसी डेटा अर्थात परिणामकारकतेचा डेटा समोर आलेला नाही. iNCOVACC ही जगातील पहिली इंट्रानेसल लस बनेल.

भारत बायोटेकनं एका निवेदनात म्हटलंय आहे की, "प्राथमिक डोस शेड्यूल म्हणून iNCOVACC चे मूल्यांकन करण्यासाठी क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तसेच ज्या लशींना यापूर्वी मान्यता देण्यात आली आहे आणि या लशींचे दोन दोन डोस लोकांना मिळाले आहेत त्यांच्यासाठी ही नाकाद्वारे घेण्यात येणारी नेझल लस बूस्टर डोस म्हणून देण्यात येणार आहे"

या लशीचा नाकातून सुलभरित्या देण्यात येणारी आणि बूस्टर डोस म्हणून दुहेरी फायदा आहे. यामुळं मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊ शकते. महामारी आणि स्थानिक रोगांदरम्यान याद्वारे मोठ्या प्रमाणात लसीकरण होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो असंही कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.