
Bhimashankar Controversy: वादात अडकलेल्या गुवाहाटीच्या भीमाशंकरचा काय आहे इतिहास?
आसाम सरकारने एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. 6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे अशी जाहिरात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलीय. या जाहीरातीवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आसाम सरकारची ही जाहीरात ट्विट केली असून शिंदे-फडणवीस सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केलीय.
आसाममधील गुवाहाटीपासून 13 किमी अंतरावर पामोहीजवळ दैनी पहाड या नावाने ओळखल्या जाणार्या डाकिनी टेकडीवर आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममधील एका टेकडीवर आहे. माता कामाख्या मंदिरापासून 20 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या मधोमध दीपोर बील येथे त्याचे पवित्र स्थान आहे.
आसाममधील गुवाहाटीमध्ये हे भगवान शंकरांचे पवित्र स्थान आहे. भिमाशंकर अशी या स्थानाची ओळख असली तरी महाराष्ट्रातही असेच एक ठिकाण आहे. ज्याला १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते.

भीमाशंकरच्या दर्शनासाठी कामरूपच्या सुंदर पर्वत आणि जंगलांमधून चालत तिथल्या निर्जन दरीमध्ये पोहोचावे लागते. या गर्दी झाडीत भगवान शंकर विराजमान असल्याचे मोहक रूप पाहता येते.
या मंदिरात उत्तर भारतातील भक्तांची गर्दी असते. गुवाहाटीच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या या धामचे वैशिष्ठ्य म्हणजे या शिवलिंगावर अखंड जलाभिषेक सुरू आहे. पावसाळ्यात तर हे शिवलिंग ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्रातच असते.

इथे मंदिर नाही. चहूबाजूंनी डोंगर असून शिवलिंगाच्या माथ्यावरून सतत पाणी वाहत असल्याचे दिसून येते. या धामच्या मार्गावर गणेशाचे मंदिर देखील आहे.
पौराणिक कथा
भिमाशंकराची उत्पत्ती त्रेतायुगात झाली होती. त्याकाळात रावणाचा धाकटा भाऊ कुंभकर्ण याच्या वीर्यापासून कर्कटीच्या पोटी भीमासुराचा जन्म झाला. तो क्षत्रिय जातीचा होता. तो या पर्वतावर राहत होता. दशरथचा मुलगा श्री राम याने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर कर्कटी आपल्या मुलासह तेथे राहू लागली.
कर्कटीने वडिल कुंभकर्ण यांचा वध श्री रामांनी केला. असे भिमासुराला सांगितले. याचा बदला घेण्यासाठी भिमासुराने ब्रम्ह देवांची तपश्चर्या केली. भगवान ब्रम्हा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी भिमासुराला शक्ती प्रदान केली.
त्या शक्तीचा प्रयोग भिमासुराने देवतांच्यावर केला. सर्व देवता चिंतीत होऊन शंकरांना शरण गेले. त्यामुळे भगवान शंकरांनी त्याचा वध केला त्यामुळे त्या वनात ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली आणि त्याला भिमाशंकर असे नाव पडले.