Bhojshala Mandir: भोजशाळेचे नियंत्रण आता 'ASI' कडे! हायकोर्टाच्या निर्णयानंतर MP सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; पाहा काय आहेत नवीन नियम!

Background of Bhojshala Mandir : मध्य प्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा प्रकरणाला उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवे वळण मिळाले आहे.
bhojshala temple verdict mohan yadav

bhojshala temple verdict mohan yadav

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या 'भोजशाळा' (Bhojshala) प्रकरणावर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. हायकोर्टाने धार येथील या वादग्रस्त वास्तूला अधिकृतपणे 'मां वाग्देवीचे (सरस्वती) मंदिर' मानले आहे. यासोबतच न्यायालयाने या वास्तूवरील मुस्लिम समुदायाचे विशेष अधिकार पूर्णपणे रद्द केले असून, येथील व्यवस्थापन आणि नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण' (ASI) कडे सोपवली आहे. या ऐतिहासिक निर्णयावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तीव्र आनंद व्यक्त केला असून, हा निकाल भारतीय संस्कृती आणि आस्थेचा सन्मान करणारा असल्याचे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com