Bhojshala Latest News: भोजशाळा मशीद आधी होतं सरस्वती मंदिर, माजी ASI अधिकाऱ्याचा मोठा दावा

Bhojshala Latest News: भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे माजी अधिकारी मुहम्मद यांनी सांगितले की, 'धार (भोजशाळा) बद्दलची ऐतिहासिक वस्तुस्थिती अशी आहे की, ते सरस्वती मंदिर होते. तिचे इस्लामिक मशिदीत रूपांतर करण्यात आले.
Bhojshala Latest News
Bhojshala Latest NewsEsakal

Bhojshala Latest News: ज्ञानवापीनंतर आणखी काही मंदिरे चर्चेत आली आहेत. अशातच मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा/कमल मौला मशिदीबाबत प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के मुहम्मद यांनी मोठा दावा केला आहे.

प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के मुहम्मद यांनी रविवारी दावा केला की, मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा/कमल मौला मशिद परिसर हे सरस्वती मंदिर होते आणि नंतर त्याचे इस्लामिक प्रार्थनास्थळात रूपांतर करण्यात आले. हिंदू आणि मुस्लिमांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी मतभेद दूर करण्यासाठी चर्चेसह प्रार्थनास्थळ कायदा, 1991 चा आदर केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Bhojshala Latest News
अबब ! चक्क भाजप अध्यक्ष जेपी नड्डांच्या पत्नीची कार गेली चोरीला!

मथुरा आणि काशीबाबत मुस्लिमांनीही हिंदूंच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असं देखील पुढे मुहम्मद म्हणाले आहेत.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील विवादित भोजशाळा संकुलाचे सर्वेक्षण करत आहे. हिंदूंच्या मतानुसार हे देवी वाग्देवी (सरस्वती) चे मंदिर आहे तर मुस्लिम समुदाय त्याला कमल मौला मशिद म्हणतात.

Bhojshala Latest News
ISKP Threat to India: भारतीय प्रार्थनास्थळांमध्ये रक्तपात करण्याची ISKP ची भारताला धमकी

माजी ASI अधिकारी मुहम्मद म्हणाले, 'धार (भोजशाळा) बद्दलची ऐतिहासिक वस्तुस्थिती अशी आहे की, ते सरस्वती मंदिर होते. तिचे इस्लामिक मशिदीत रूपांतर करण्यात आले. परंतु प्रार्थना स्थळ कायदा 1991 नुसार, धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यासाठी आधारभूत वर्ष 1947 आहे. 1947 मध्ये मंदिर असेल तर ते मंदिर आहे आणि जर मशीद असेल तर ती मशीद आहे.

Bhojshala Latest News
Kangana Ranaut : रामाची भूमिका निभावलेल्या अरुण गोविलांना भाजपचं तिकीट, कंगना रणौतही निवडणुकीच्या रिंगणात

१९७६-७७ मध्ये अयोध्येत मुहम्मद हे प्राध्यापक बी.बी. लाल यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या उत्खनन पथकाचा भाग होते. ते पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत. त्यांनी याआधी असा दावा केला होता की, त्यांनी पहिल्यांदा बाबरी मशिदीच्या खाली राम मंदिराचे अवशेष पाहिले आहेत. दोन्ही पक्षांनी या कायद्याचा आदर करावा. उच्च न्यायालय सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

11 मार्च रोजी उच्च न्यायालयाने एएसआयला सहा आठवड्यांच्या आत भोजशाळा संकुलाचे 'वैज्ञानिक सर्वेक्षण' करण्याचे निर्देश दिले होते. रविवारी सर्वेक्षणाचा तिसरा दिवस होता.

Bhojshala Latest News
BJP Candidate List : सोलापूर लोकसभेसाठी भाजपची मोठी खेळी; दिला तरुण उमेदवार, देशभरातून पाचवी यादी जाहीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com