मध्य प्रदेशात आज पासून वंदे मातरम् बंद

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 जानेवारी 2019

मध्य प्रदेशातील कर्मचाऱ्यांच्या वंदे मातरम् गायनावर बंधन घालण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले आहेत. कमलनाथ सरकारने हा निर्णय घेतला आहे की, राज्य सचिवालयाच्या बाहेर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वंदे मातरम् या भारतीय राष्ट्रीय गीताचे गायन होत असे. परंतु, हे गायन बंद करण्याचे आदेश कमलनाथ यांनी दिले आहेत.

भोपाळ- मध्य प्रदेशातील कर्मचाऱ्यांच्या वंदे मातरम् गायनावर बंधन घालण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले आहेत. कमलनाथ सरकारने हा निर्णय घेतला आहे की, राज्य सचिवालयाच्या बाहेर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वंदे मातरम् या भारतीय राष्ट्रीय गीताचे गायन होत असे. परंतु, हे गायन बंद करण्याचे आदेश कमलनाथ यांनी दिले आहेत.

यावेळी कमलनाथ यांनी कर्मचाऱ्यांना ताकीद देताना म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांनी लोककल्याणकारी गोष्टींवर भर द्यायला हवा. देशभक्ती ही गायन करून दाखवायची गोष्ट नसून ती कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून दाखवावी असे म्हणताना त्यांनी थेट भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. वंदे मातरम् या गाण्याचे गायन बंद करण्याचे आदेश कमलनाथ यांनी दिल्यामुळे आज (ता.1) सचिवालयाबाहेर गायन झाले नाही.

दरम्यान, या सरकारचा ही पहिलीच एक तारीख होती आणि या सरकारमध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे गायन बंद केले. पहिल्या सरकारमध्ये प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आवर्जून वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे गायन सचिवालयासमोर होत असे. तसेच, मध्य प्रदेशात काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर कमलनाथ यांनी देशभरात गायींवरून राजकारण सुरु असताना गायींचे संगोपन करण्याचे आदेश मध्य प्रदेश सरकारने दिले आजच आहेत.

Web Title: bhopal bjp targets congress kamal nath government in madhya pradesh for banning vande matram