
Bhopal Court Incident Accused Escapes: भोपळमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या आरोपीने शिक्षा ऐकताच न्यायालयामधून धूम ठोकली. आरोपी आसिफ खान उर्फ टिंगू यास न्यायालयाने हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवत दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती.