ईशान्य भारतात शांततेचा मंत्र घुमतोय 

ईशान्य भारतात शांततेचा मंत्र घुमतोय 

इंफाळ (मणिपूर) - कोरोना संसर्गाचा मुकाबला आपल्याला धैर्याने करायचा असून तो जिंकायचा आहे. त्याचबरोबर विकासाची कामे देखील तितक्याच वेगाने पुढे न्यायची आहेत. ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित होत असून शांतता, विकास आणि भरभराटीचा मंत्र घुमत आहे, असे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मणिपूर येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन केले. त्यावेळी ते बोलत होते. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, की पूर्वोत्तर आणि ईशान्य भारताला सध्या दोन प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे बळी जात आहेत. लाखो लोक बेघर झाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मणिपूरमध्ये कोरेानाला रोखण्यासाठी राज्य सरकार अहोरात्र प्रयत्न करत आहेत. लॉकडाउनच्या काळात परराज्यात गेलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पावले उचलली आहेत. संकटाच्या काळात गरीबांना सर्वप्रकारची मदत करायची आहे, असेही ते म्हणाले. मणिपूर राज्यासाठी आजचा दिवस विशेषत: भगिनी मंडळींसाठी महत्त्वाचा आहे. राखीचा सण जवळ येत असून त्यापूर्वीच राज्यातील बहिणींना मोठी भेट मिळणार आहे. ३ हजार कोटी खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेमुळे स्थानिक नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. १७०० हून अधिक गावांत या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. हा प्रकल्प जीवनवाहिनीप्रमाणे काम करेल. हा प्रकल्प तात्पुरता नाही तर पुढील दोन तीन दशकांचा विचार करुन अंमलात आणला आहे. या प्रकल्पाचे काम लॉकडाउनच्या काळातही थांबलेले नाही, असे मोदी म्हणाले. 

ईशान्यकडील राज्यात देशाच्या विकासाला पुढे नेण्याची क्षमता आहे. या ठिकाणी शांतता प्रस्थापित होत आहे. पीस-प्रोग्रेस आणि प्रॉस्परिटीचा मंत्र येथे घुमत आहे. या वेळी मोदी यांनी मणिपूरच्या नागरिकांनी साथ दिल्याबद्धल आभार मानले. अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंसाचार आता थांबला आहे. त्रिपुरा आणि मिझोराम येथील हिंसा देखील थांबली आहे. चांगली पायाभूत सुविधा, दळणवळण आणि शांतता या तिन्हीच्या मदतीने वाटचाल होत असेल तर उद्योग आणि गुंतवणुकीची शक्यता वाढेल, असे पंतप्रधान म्हणाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मणिपूर पाणीपुरवठा प्रकल्प म्हणजे काय 
ग्रेटर इंफाळ नियोजित भागातील घरे, २५ खेडे आणि मणिपूरच्या १६ जिल्ह्यातील १७३१ गावातील २,८०,७५६ घरापर्यंत पाणी देण्यासाठी प्रकल्पांची रचना केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र येऊन खर्च उचलणार आहे. केंद्राने ११८५ गावातील १,४२,७४९ घरांपर्यंत नळाद्वारे पाणी देण्यासाठी निधी दिला आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी हे ध्येय साध्य करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com