esakal | ठरलं! भुपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

ठरलं! भुपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री

ठरलं! भुपेंद्र पटेल होणार गुजरातचे मुख्यमंत्री

sakal_logo
By
विनायक होगाडे

गांधीनगर: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आणि मोठा राजकीय भुकंप झाला. त्यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष आता मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे होती. गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत चर्चा होत्या. भारतीय जनता पक्षाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांची नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होती. मात्र, आता गुजरात भाजपने भुपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली आहे. ते घाटलोडीया मतदारसंघामधून आमदार आहेत. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली आहे.

ज्या नेत्यांची नावे संभाव्य मुख्यमंत्री पदासाठीच्या नावांची यादी होती, त्या यादीपैकी कुणालाही संधी न देता वेगळं नाव समोर आलेलं दिसत आहे. विजय रुपाणींचा राजीनामा जितका आश्चर्यकारक होता तितकीच ही निवड देखील आश्चर्यकारक मानण्यात येत आहे.

loading image
go to top