गायीच्या शेणानंतर भूपेश सरकार आता 'गोमूत्र' खरेदी करणार; जाणून घ्या प्रतिलिटरचा भाव काय असेल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Godhan Nyay Yojana

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी छत्तीसगड सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत.

Chhattisgarh : गायीच्या शेणानंतर भूपेश सरकार आता 'गोमूत्र' खरेदी करणार

रायपूर : शेतकऱ्यांसाठी छत्तीसगड सरकारकडून (Chhattisgarh Government) अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामुळं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. आता याठिकाणी भूपेश बघेल (Bhupesh Baghel) सरकार गोमूत्र खरेदी करणार आहे. गोमूत्र खरेदीसाठी सरकारनं संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार केलीय. यामुळं याकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय.

या प्रस्तावाला भूपेश मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. याबाबत आता सरकारकडून कार्यवाही सुरु करण्यात आलीय. 28 जुलैपासून ही योजना सुरु होणार आहे. सरकार 4 रुपये लिटर दरानं गोमूत्र खरेदी करणार आहे. गोधन न्याय योजनेंतर्गत (Godhan Nyay Yojana) 2 रुपये किलोनं शेण खरेदी केल्यानंतर सरकारची ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना असेल. यामुळं शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत.

याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी माहिती दिलीय. ते म्हणाले, 'छत्तीसगड (Chhattisgarh) हे शेण खरेदी करणारं देशातील पहिलं राज्य आहे. आता आम्ही गोमूत्रही खरेदी करणार आहोत. याचा मोठा फायदा शेतकरी आणि पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. लोकांनी घरात किंवा गोठ्यात जनावरे बांधून ठेवायला सुरुवात केली आहे. मूत्र खरेदीपासून मोकळ्या राहणाऱ्या गायींनाही बांधण्यात येणार आहेत, यामुळं रोडवर फिरणाऱ्या गाई देखील आता दिसणार नाहीत. तसंच आता यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणाहून सुरुवात होणार आहे. पशुपालकांकडून गोमूत्र खरेदी केलं जाणार असून त्यापासून सेंद्रिय कीटकनाशके तयार केली जाणार आहेत.'

हेही वाचा: दलितांमध्ये स्वार्थाची कमी नाही, सगळे मतलबी आहेत; मायावती संतापल्या

दोन वर्षांपूर्वी शेणखत खरेदी सुरू

2 वर्षांपूर्वी 20 जुलै 2020 रोजी हरेली इथं गोधन न्याय योजनेअंतर्गत 2 रुपये प्रति किलो या दरानं शेणखत खरेदी सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत 20 लाख क्विंटलपेक्षा जास्त गांडूळ खत, सुपर कंपोस्ट खत हे शेणापासून महिला बचत गटांनी तयार केलंय, त्यामुळं राज्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळालंय. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रयत्न पुढे नेण्यासाठी गोमूत्र खरेदी उपयुक्त ठरणार असून याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

Web Title: Bhupesh Baghel Government Will Buy Cow Urine In Chhattisgarh Starting From Hareli Tihar Price Rs 4 Per Liter

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..