Accident: बिहारच्या वैशालीमध्ये मोठा अपघात, ट्रकने 30 जणांना चिरडलं, 12 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident in Bihar

Accident: बिहारच्या वैशालीमध्ये मोठा अपघात, ट्रकने 30 जणांना चिरडलं, 12 जणांचा मृत्यू

बिहार राज्यातील वैशाली येथे काल (रविवारी) रात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. दरम्यान या अपघातामध्ये लहान मुले आणि महिलांसह एकूण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मृत झालेले आणि जखमी झालेले लोक पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून पूजा करत होते. तेवढ्यात एक ट्रक 120 च्या वेगाने आला आणि लोकांना चिरडून निघून गेला.

दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासना घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून मुलांचे मृतदेह आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करून दिली.

हेही वाचा: Navale Bridge Accident : ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने 26 वाहनांना उडविले

दरम्यान अपघातामध्ये नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. या घटनेत आठ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Biharaccident