Chandrababu Naidu: चंद्राबाबू नायडूंना धक्का! स्कील डेव्हलपमेंट घोटाळ्यातील FIR रद्द करण्यास HCचा नकार

chandrababu Naidu
chandrababu Naidu
Updated on

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसला आहे. स्कील डेव्हलपमेंट घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास उच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे.

chandrababu Naidu
Danish Ali : नफ़रत के बाज़ार में मोहब्बत की दुकान! 'त्या' BSP खासदाराची राहुल गांधींनी घेतली भेट

या प्रकरणी नायडू यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली. तर सरकारतर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. गुन्हा दाखल झाला असेल तर त्याची चौकशी होऊ द्या, असा युक्तिवाद रोहतगी यांनी केला होता.

चंद्राबाबू नायडू यांना 9 सप्टेंबर रोजी स्कील डेव्हलपमेंट निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यामुळे सरकारी तिजोरीचे 300 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. नायडू सध्या राजमहेंद्रवरम मध्यवर्ती कारागृहात आहेत.

chandrababu Naidu
Gautami Patil : गौतमीने सांगितली, लग्नासाठीची मुख्य अट; म्हणाली, ती पूर्ण झाली तर...

आंध्र प्रदेश न्यायालयाने नायडू यांना दोन दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. विशेष सरकारी वकील वाय.एन. विवेकानंद म्हणाले की, एसीबीच्या विशेष न्यायालयाने नायडू यांना 23 आणि 24 सप्टेंबर या दोन दिवसांच्या चौकशीसाठी पोलिस कोठडीत पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com