Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, १५ कोटी धारकांना होणार नव्या नियमाचा फायदा

शासन नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा लाभ तब्बल १५ कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.
Ration Card new rule
Ration Card new ruleesakal

रेशनकार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी पुढे येतेय. शिधापत्रिका धारकांसाठी आता शासन नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा लाभ तब्बल १५ कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. उत्तर प्रदेश सरकार सार्वजनिक रेशन वितरण व्यवस्थेत मोठा बदल करत आहे. या बदलानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानांमधून चांगले पौष्टिक तांदूळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

शासन रेशन कार्ड धारकांसाठी वेळोवेळी पावले उचलत असते. रेशन दुकानांमध्ये मिळणारे तांदूळ पौष्टिक असणार असून १५ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत यूपीमध्ये सुमारे ८० हजार रेशन दुकाने आहेत. या दुकानांच्या माध्यमातून ३.५९ कोटी शिधापत्रिका धारकांच्या नातेवाईकांपर्यंत पौष्टिक तांदूळ पोहोचणार आहेत. कुपोषण थांबवण्याच्या दिशेने शासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

२०२३ पासून हे तांदूळ प्रत्येक दुकानात उपलब्ध होईल. उत्तर प्रदेशात मध्यान्ह भोजन योजना आणि एकात्मिक बाल विकास योजने (ICDS) साठी सप्टेंबर २०२१ पासून पौष्टिक तांदूळ (Fortified Rice) वाटप केला जाणार आहे. जून महिण्यापासूनच राज्यातील ३१ जिल्ह्यांत शिधावाटप दुकानांत फोर्टिफाइड तांदूळ वितरित करण्यात आले.

Ration Card new rule
Ration Card: रेशन दुकानांतून धान्य घेण्याच्या नियमांत बदल! नवीन तरतुदी जाणून घ्या

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरपासून राज्यात धान खरेदी सुरू होईल. यावेळी शासकीय खरेदी केद्रांवर तांदूळ गिरण्यांना डिसेंबरच्या अखेरीस चांगला तांदूळ मिळण्यास सुरूवात होईल. त्यानुसार पुढील वर्षाच्या सुरूवातीपासूनच म्हणजेच जानेवारीपासूनच सर्व जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानांतून पौष्टिक तांदूळ वाटप सुरू होईल.

Ration Card new rule
Ration Card वर मोबाईल नं. अपडेट करायचा? फॉलो करा ही प्रोसेस

यावर्षी सुमारे ४७ लाख टन तांदूळ सरकारकडे राहाणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

पौष्टिक तांदळाचे फायदे

देशातील काही भागातील महिला अशक्तपणाने त्रस्त आहेत. कुपोषण थांबवण्यासाठी हे पोषणयुक्त तांदूळ महत्वाचे ठरतात. नियमानुसार, एक किलो फोर्टिफाइड तांदळात 28 ते 42.5 मिलीग्राम लोह, 75 ते 125 मायक्रोग्रॅम फॉलिक अ‍ॅसिड आणि 0.75 ते 1.25 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन बी-12 असते. फोर्टिफाइड तांदूळ महिलांमधील अ‍ॅनिमिया तसेच लहान मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com