up police bharati age limit concession
sakal
उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची मोठी भेट दिली आहे. ३२,६७९ शिपाई आणि समकक्ष पदांच्या थेट भरतीसाठी सरकारने सर्व प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षांची शिथिलता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या उमेदवारांना आता पोलीस दलात सामील होण्याची पुन्हा एक संधी मिळणार आहे.