राहुल गांधी यांच्या पदयात्रेस दिल्लीत माेठा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज (2 ऑक्टोबर) राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत काँग्रेस भवन ते राजघाटपर्यत पदयात्रा काढली. या पदयात्रेला तुफान प्रतिसाद मिऴाला.

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज (2 ऑक्टोबर) राष्ट्रपिता महात्मा गांधींजींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत काँग्रेस भवन ते राजघाटपर्यत पदयात्रा काढली. या पदयात्रेला तुफान प्रतिसाद मिऴाला.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या, जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या, सत्याग्रहाच्या मार्गानं बलाढ्य शत्रूला नमवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 150 वी जयंती आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. 

या नंतर काँग्रेसकडून आज देशाच्या विविध भागांमध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहेत. त्यापैकी दिल्लीतल्या पदयात्रेचं नेतृत्व राहुल गांधी यांनी केले. या पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्ते माेठ्या प्रमाणात सहभागी झाले हाेते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big response to Rahul Gandhi's march in Delhi