
तीव्र विरोधानंतरही 'अग्निपथ' योजना सुसाट; IAF कडे तब्बल साडेसात लाख अर्ज
नवी दिल्ली : लष्कर भरतीच्या (Army Recruitment) अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) देशभरात प्रचंड विरोध होत आहे. ही योजना मागे घेण्याची मागणी करत अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनं, जाळपोळ झाली. एकीकडे विरोध होत असताना अग्निपथ योजना सुसाट असून योजनेला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं समोर आलं आहे. (Big response to Agneepath scheme)
हेही वाचा: 'अग्निपथ'विरोधातील याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी
अग्निपथ योजना मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर आता न्यायालयानं सुनावणी घेण्याचं मान्य केलंय. दुसरीकडे या योजनेसाठी अर्ज केलेल्यांचा आकडा थक्क करणार आहे. केवळ इंडियान एअर फोर्समध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 लाख 49 हजार 899 अर्ज प्राप्त झाले आहेत. याआधी अर्ज प्राप्त होण्याची सर्वोच्च संख्या 6 लाख 31 हजार 528 एवढी होती. मात्र इंडियन एअर फोर्सच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) अग्निपथ योजनेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्याचं मान्य केलं असून पुढील आठवड्यात त्यावर सुनावणी होणार आहे. केंद्र सरकार (Central Government) आणि लष्कराकडून ही भरती योजना मागं घेणार नसल्याचं आधीच सांगण्यात आलं आहे.
Web Title: Big Response To Agneepath Scheme
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..