esakal | Bihar Election - RJD नेत्याच्या हत्येनं खळबळ; गर्दीला धमकावण्यासाठी बेछूट गोळीबार
sakal

बोलून बातमी शोधा

bihar election rjd leader dead shot

तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी पूर्णियामध्ये शांततेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी तयारी केल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला होता. मात्र हल्लेखोरांनी संवेदनशील अशा पूर्णियामध्ये हत्या करून आयोगाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

Bihar Election - RJD नेत्याच्या हत्येनं खळबळ; गर्दीला धमकावण्यासाठी बेछूट गोळीबार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election) तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी निवडणुकीला गालबोट लागलं आहे. शनिवारी पूर्णियातील धमदाहा इथं आरजेडी (RJD) नेते बिट्टू सिंह यांच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शांततेत सूरु असलेल्या मतदान प्रक्रियेला आव्हान देत हल्लेखोरांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. 

तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी पूर्णियामध्ये शांततेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी तयारी केल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला होता. मात्र हल्लेखोरांनी संवेदनशील अशा पूर्णियामध्ये हत्या करून आयोगाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राजद नेते बिट्टू सिंह यांच्या भावावर इतक्या गोळ्या चालवल्या की त्याचे शरीर छिन्नविछिन्न झाले होते. 

हे वाचा - बाबा का ढाबा प्रकरण; यूट्यूबर गौरव वासवानविरोधात खटला दाखल

हल्लेखोरांनी अनेक राउंड फायर केल्याचं समजते. बेनी सिंह असे बिट्टू सिंह यांच्या हत्या झालेल्या भावाचे नाव आहे. गर्दीला धमकावण्यासाठी गोळीबार करण्यात आला. मतदानादिवशीच झालेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. पूर्णिया जिल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.