esakal | आश्यर्यच! 70 वर्षीय भुईयां यांनी डोंगर तोडून 5 किमी लांबीचा बनवला कालवा
sakal

बोलून बातमी शोधा

bihar

एका 70 वर्षांच्या माणसाने तीस वर्षांच्या मेहनतीने डोंगर तोडून पाच किलोमीटर लांबीचा कालवा बांधला. त्यांच्या मेहनतीनंतर आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावातील नागरिकांना याचा फायदा होत आहे.

आश्यर्यच! 70 वर्षीय भुईयां यांनी डोंगर तोडून 5 किमी लांबीचा बनवला कालवा

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

बिहारमधील माउंटेनमॅन दशरथ मांझी यांचे नाव सर्वांनी ऐकले आहे. ज्यांनी एकटेच हातोडा आणि छिन्नीने 360 फूट लांबीचा, 30 फूट रुंद आणि 25 फूट उंच डोंगराचा भाग कट केला आणि 22 वर्षांच्या मेहनतीनंतर रस्ता बनवला आहे. अशाच एका 70 वर्षांच्या माणसाने आपल्या कष्टाने शेकडो खेड्यांमधील अडचणींवर विजय मिळविला आहे. तीस वर्षांच्या मेहनतीने डोंगर तोडून पाच किलोमीटर लांबीचा कालवा बांधला. त्यांच्या मेहनतीनंतर आता डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात आहे. ज्यामुळे तीन गावातील नागरिकांना याचा फायदा होत आहे.

बिहारच्या गया येथील रहिवासी लौंगी भुईया यांनी कठोर परिश्रम घेऊन अनेकांसमोर एक उदाहरण मांडले आहे, ज्याची भविष्यातसुद्धा नेहमी सर्वांना आठवण राहणार आहे. 30 वर्षे कष्ट घेतल्यानंतर आम्ही डोंगरावरुन पडणाऱ्या पावसाचे पाणी गोळा करून ते गावात आणण्याचे ठरविले. आणि दररोज ते घरातून जंगलात जाऊन कालवा बांधायला सुरुवात केली होती. कोठीलवा गावातील रहिवासी असलेले लौंगी भुईयां हे आपला मुलगा, सून आणि पत्नीसह राहतात. भुईयांनी सांगितले की, सुरुवातीला कुटुंबातील लोकांनी त्यांना हे काम करण्यासाठी खूप नकार देत होते. पण त्यांनी घरातील कुणाचेसुद्धा ऐकले नाही व कालवा खोदण्यास सुरवात केली.

वास्तविक, या भागात पाण्याअभावी लोक केवळ मका आणि हरभरा पिकवत आहे. अशा परिस्थितीत गावातील सर्व तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात खेड्यातून शहरांकडे गेले आहे. कामाच्या शोधात बरेच लोक खेड्यातून दूर गेले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मनात असा विचार आला की, इथे पाण्याची व्यवस्था असेल तर लोकांचे स्थलांतर रोखता येईल. कठोर परिश्रमानंतर आता हा कालवा तयार झालेला आहे. तसेच या भागातील तीन गावांतील तीन हजार लोक याचा लाभ मिळत आहे.

ग्रामस्थ म्हणाले, जेव्हापासून त्यांना जाणीव झाली तेव्हापासून लौंगी भुईयां हे घरात कमी आणि जंगलामध्ये जास्त थांबायचे. त्याच बरोबर भुईयां म्हणाले की, जर सरकार आम्हाला मदत करू शकले तर आम्हाला शेतीसाठी ट्रॅक्टर सारख्या सुविधा मिळाल्या तर शेतीसाठी सुपीक जमीन बनवता येईल. जे लोकांना खूप मदत करेल. त्याच वेळी, प्रत्येकजण भुईयां यांच्या कामामुळे प्रभावित झाले आहे. आज त्यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात घेतले जात आहे. अनेकजण त्यांच्या  कामाचे कॊतुक करत आहेत. ज्यांनी 30 वर्षात पाच फूट रुंद आणि तीन फूट खोल कालवा बनविला आणि हजारो लोकांच्या अडचणी सोडवल्या आहेत.