आता 'या' राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन; सर्वच व्यवहार राहणार बंद

कृपादान आवळे
Tuesday, 14 July 2020

लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा, महाविद्यालये, दुकाने, मॉल्स् आणि धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जात आहे. पण आता बिहारमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा, महाविद्यालये, दुकाने, मॉल्स् आणि धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बिहारमध्ये पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 16 जुलै ते 31 जुलै या कालावधीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दुकाने, मॉल्स्, सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरुच राहणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजधानी पटणा येथे नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीमध्ये सांगितले, की 9129 नुमन्यांची तपासणी गेल्या 24 तासांत झाली. त्यापैकी 12,364 जण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 70.97 टक्के इतके झाले आहे. हा दर राष्ट्रीय दरापेक्षा जास्त आहे. तसेच आता 4227 ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर 11,953 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

यापैकी 1266 नवे केसेस तर सर्वाधिक संख्या 177 पटणा जिल्ह्यात आहे. त्यानंतर सिव्हन, भगलपूर, नालंदा, नावाडा आणि बेगूसुराई, मुंगर पश्चिम चंपारण या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Announces complete lockdown all shops malls religious places to remain shut till 31 July