Politics : लाडू खायला दिले म्हणून आरजेडी-भाजप आमदारांमध्ये हाणामारी, नाराजांनी लाडू दिले फेकून

आम्ही सर्व भाजप आमदार तिथं उभे होतो आणि त्यांनी जबरदस्ती आम्हाला लाडू खायला दिले.
RJD-BJP MLA
RJD-BJP MLAesakal
Summary

विधानसभेचे अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांनी मंगळवारी सभागृहातील माईक तोडल्याप्रकरणी आमदार लखिंद्र पासवान यांच्यासह भाजपच्या दोन आमदारांना निलंबित केलं.

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabari Devi), आणि त्यांची कन्या मीसा भारती (Misa Bharati) यांना दिल्ली कोर्टाकडून आज रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) अटक न करता आरोपपत्र दाखल केल्याचं न्यायालयानं नमूद केलं. प्रत्येक आरोपीला 50,000 रुपयांचे वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढीच रक्कम जामीन म्हणून देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

दरम्यान, हा जामीन मंजूर होतात आरजेडी आमदारांमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळालं. या आनंदाच्या बहरात या आमदारांनी चक्की भाजप आमदारांना मिठाई आणि लाडू खायला दिले. यावेळी बिहार विधानसभेच्या बाहेर दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाली. भाजप आमदारांनी मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.

RJD-BJP MLA
Sharad Pawar : '..म्हणून आम्ही शरद पवारांना घाबरतो'; शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा म्हणाले, 'आम्ही सर्व भाजप आमदार तिथं उभे होतो आणि त्यांनी जबरदस्ती आम्हाला लाडू खायला दिले. लाडू खाऊ घालण्याच्या बहाण्यानं त्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली. राजदच्या आमदारांनी आमचा छळ केला असून याबाबत मी राज्यपालांकडं तक्रार करणार आहे.'

विधानसभेचे अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांनी मंगळवारी सभागृहातील माईक तोडल्याप्रकरणी आमदार लखिंद्र पासवान यांच्यासह भाजपच्या दोन आमदारांना निलंबित केलं. याच्या निषेधार्थ भाजपचे सर्व आमदार विधानसभेबाहेर राज्य सरकारचा निषेध करत होते.

RJD-BJP MLA
हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com