Bihar Election: पहिल्याच घासाला खडा; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत मोडली आघाडी 

bihar e
bihar e

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीत जागावाटपाची माहिती देण्यासाठी महाआघाडीने आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गोंधळ उडाला. महाआघाडीच्या पत्रकार परिषदेतच महाआघाडी मोडली. 25 जागांची मागणी करत विकासशील इन्सान पार्टीचे (व्हीआयपी) प्रमुख मुकेश सहनी यांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. यावेळी मुकेश सहनी यांच्या समर्थकांनी तेजस्वी यादव मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. मुकेश सहनी हे पत्रकार परिषद अर्ध्यातच सोडून हॉटेल बाहेर निघून गेले. 

मुकेश सहनी यांनी महाआघाडीच्या डीएनएमध्येच दोष असल्याची टीका केली. ते म्हणाले की, दिवसभर 'राबडी निवासस्थानी' बसल्यानंतर मला 25 जागा आणि उपमुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेतच माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तेजस्वी यांच्या डीएनएतच अडचण आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

Bihar Election: महाआघाडीचं ठरलं, राजद 144 तर काँग्रेस 70 जागांवर लढणार

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत जागा वाटपाची माहिती दिली. या निवडणुकीत राजद 144 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस 70 जागा आणि त्याचबरोबर वाल्मिकीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देणार आहे. सीपीएमला 4 जागा, सीपीआयला 6, सीपीआयला (माले) 19 जागा देण्यात आल्या आहेत. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीला राजदच्या कोट्यातून जागा देण्यात असल्याचे यादव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com