esakal | Bihar Election 2020 - पहिल्या टप्प्यासाठी ५५ टक्के मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

bihar voting main.jpg

आठ मंत्र्यांसमवेत अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंदिस्त होणार आहे. 

Bihar Election 2020 - पहिल्या टप्प्यासाठी ५५ टक्के मतदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा Bihar Election 2020 -  बिहारमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ५५ टक्के मतदान झाले. राज्याच्या एकूण २४३ पैकी ७१ मतदारसंघांमध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे ४२, संयुक्त जनता दलाचे ३५ आणि भाजपचे २९ उमेदवार रिंगणात आहेत.

कोरोना संसर्ग असल्याने कमी प्रमाणात मतदान होण्याचा अंदाज मतदारांनी खोटा ठरविला. मतदान अधिक झाल्याने ही मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. आज मतदान झालेल्या ७१ मतदारसंघांपैकी ३५ मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्याने एक ते तीन तास कमी वेळ मतदानासाठी मिळाला. मतदान संघावर हेलिकॉप्टरद्वारे नजर ठेवली गेली. सर्वच मतदारसंघांवर सॅनिटायझर आणि तापमान चाचणीची व्यवस्था करण्यात आली होती. मास्क असल्याशिवाय मतदान केंद्रांमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. मतदान प्रक्रिया सुरु असताना काही केंद्रांवरील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या.

माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, कॉमनवेल्थ स्पर्धांतील सुवर्णपदक विजेती श्रेयसी सिंह, माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव सिन्हा आणि राज्याचे अनेक मंत्र्यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये आज बंद झाले. निवडणुकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान अनुक्रमे ३ आणि ७ नोव्हेंबरला होणार आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
 

Live Updates:

- दुपारी एक वाजेपर्यंत 33.10 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

- पहिल्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.48 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

-

- कमळ चिन्ह असलेला मास्क घालून भाजप मंत्र्याचे मतदान

- अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याची तक्रार

- दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर सीआरपीएफचे जवान मदत करत आहेत.

- बिहारचे मंत्री प्रेम कुमार हे सायकलवर मतदानासाठी गेले.

- पहिल्या टप्प्यात आठ वाजेपर्यंत 5 टक्के मतदान

- जेहानाबाद येथील एका मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाला उशीर झाला.

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सॅनिटायझर, सुरक्षित अंतराचे पालन केले जात आहे. 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना लोकशाहीच्या या उत्सवात हिरिरीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी टि्वट करुन मतदारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला दिला आहे. 

- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लखीसराय मतदान केंद्रात मतदान केले.

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र सॅनिटाइझ करण्यात आले.

- मतदानापूर्वी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

- औरंगाबाद येथील धीबरा परिसरात मतदान सुरु होण्यापूर्वी दोन स्फोटके मिळाली. सीआरपीएफच्या पथकांनी स्फोटके निकामी केली.

- गया येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेले मतदार

- पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात झाली आहे.