बिहार निवडणूक 2020: भाजपच्या पहिल्या सभेत मोदी, नितीश यांच्या कामाची प्रशंसा

वृत्तसंस्था
Monday, 12 October 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकारणाची दिशा बदलली आणि विविध क्षेत्रांत बरेच काम केले, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

गया - बिहारमध्ये काँग्रेसने धर्म आणि जातीवर आधारीत राजकारण केले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकारणाची दिशा बदलली आणि विविध क्षेत्रांत बरेच काम केले, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. मोदी है तो मुमकीन है, नितीश है तो प्रदेश आगे बढेगा, अशी घोषणाही त्यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याची पहिली सार्वजनिक प्रचार सभा रविवारी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात नड्डा म्हणाले की, आरोग्य कल्याण, शेतकरी कल्याण, शिक्षण, कौशल्य विकास अशा क्षेत्रांत मोदी यांनी विकासात्मक बदल घडवून आणले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या पाच वर्षांतील आपल्या कामाची माहिती घेऊन लोकांकडे जा आणि ती त्यांच्यासमोर सादर करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री सुशील मोदी उपस्थित होते. नड्डा यांनी प्रारंभी महावीर मंदिराला भेट दिली आणि तेथे प्रार्थना केली. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांच्या स्मारकाला भेट दिली. एका महान नेत्याच्या घराला भेट देता येणे हे मोठे भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी ते म्हणाले की, मी महाविद्यालयात असताना जयप्रकाश नारायण आंदोलन करीत होते. आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी आवाज उठविला.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar assembly elections 2020 BJP National President J. P. Nadda praised the work of Modi and Nitish