Tejashwi Yadav News : बिहारमध्ये निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांना एक नाहीतर तीन मोठे धक्के!

Tejashwi Yadav’s RJD faces three major setbacks : जाणून घ्या, नेमकं काय घडलंय? बिहारमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.
Tejashwi Yadav during a recent press conference as RJD faces internal turmoil ahead of the Bihar Assembly elections 2025.

Tejashwi Yadav during a recent press conference as RJD faces internal turmoil ahead of the Bihar Assembly elections 2025.

esakal

Updated on

Bihar Assembly Election RJD Update : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केलेल्या आहेत. दरम्यान, निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाला एक नाहीतर तीन धक्के बसले आहेत. राजदच्या दोन विद्यमान आमदारांनी पक्ष सोडला आहे, तर एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने ही जागा पक्षाला गमावावी लागली आहे.

कारण, परसा आणि बनियापूर विधानसभा मतदारसंघातील राजदच्या विद्यमान आमदारांनी निवडणुकीआधीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. परसाचे आमदार छोटेलाल राय यांनी जदयू मध्ये प्रवेश केला आहे, तर बनियापूरचे आमदार केदारनाथ सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आमदारांना भाजप आणि जदयूने तत्काळ उमेदवारीही जाहीर केली आहे.

याशिवाय बिहार निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षाला मतदानापूर्वीच कैमूर जिल्ह्यातील मोहनिया ही विधानसभेची जागा गमवावी लागली आहे. मोहनिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजद उमेदवार श्वेता सुमन यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.

Tejashwi Yadav during a recent press conference as RJD faces internal turmoil ahead of the Bihar Assembly elections 2025.
Annu Kapoor Final Wish : अन्नू कपूर यांनी सांगितली अंतिम इच्छा, म्हणाले ‘’त्या दिवशी दिवाळी, ईद...’’

२०२० च्या निवडणुकीत त्यांनी त्यांचे जन्मस्थान उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्हा म्हणून नोंदवले होते, परंतु २०२५ च्या निवडणुकीत त्या बिहारच्या रहिवासी म्हणून दाखवले जात होते, ज्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आणि अखेर आज त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com