Bihar Crime Minor Girl Assault : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील बरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नातेसंबंधांना काळिमा फासणारी एक क्रूर घटना घडली आहे. एका सावत्र बापानं आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर सलग सहा महिने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून, महिला पोलीस ठाण्यात (Women Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.