Nitish Kumar Announces Free Electricity in Bihar Before Electionsesakal
देश
Nitish Kumar Announcement : बिहारमध्ये मिळणार मोफत वीज; आगामी निवडणुकीपूर्वी नितीशकुमारांकडून ‘गिफ्ट’
CM Nitish Kumar Offers Free Electricity Scheme : बिहारातील १.६७ कोटी घरगुती वीज ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली आहे.
पाटणा : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा आज केली. नितीशकुमारांनी सोशल मीडियावरून राज्य सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. या निर्णयाचा राज्यातील १.६७ कोटी घरगुती वीज ग्राहकांना फायदा होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.