CM Nitish Kumar vs BJP
CM Nitish Kumar vs BJPesakal

Nitish Kumar : दमण-दीवमध्ये नितीश कुमारांना मोठा झटका; 'जेडीयू'ची संपूर्ण युनिट भाजपमध्ये विलीन

भारतीय जनता पक्षानं जनता दल-युनायटेडला आणखी एक धक्का दिलाय.
Summary

भारतीय जनता पक्षानं जनता दल-युनायटेडला आणखी एक धक्का दिलाय.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षानं (BJP) जनता दल-युनायटेडला (JDU) आणखी एक धक्का दिलाय. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या पक्षाच्या दमण आणि दीव (Daman and Diu) युनिटचं सोमवारी भाजपमध्ये विलीनीकरण झालंय. दमण आणि दीवमधील JD(U) च्या 17 पैकी 15 जिल्हा पंचायत सदस्य आणि JD(U) राज्याच्या संपूर्ण युनिटनं काल भाजपमध्ये प्रवेश केला. नितीश कुमार यांच्या भाजप सोडण्याच्या निर्णयाविरोधात नेत्यांनी हे पाऊल उचललंय.

बिहारमध्ये (Bihar) आम्ही विकासाला चालना दिली होती. मात्र, जेडीयूनं 'बाहुबली'ची निवड केली. त्यामुळं त्यांचे नेते आता नाराज झालेत, असं ट्विट करून भाजपनं निशाणा साधलाय. ट्विटद्वारे भाजपनं खरपूस समाचार घेत म्हटलंय की, 'भाजप राज्याचा विकास करत असताना जेडीयूनं आरजेडीसोबत जाऊन बाहुबल्यांना (RJD) पाठिंबा दिलाय.'

CM Nitish Kumar vs BJP
VIDEO : अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टीना फर्नांडिसांच्या हत्येचा प्रयत्न; बंदूकधारी व्यक्तीला अटक

काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील जेडीयूचा एक मोठा आमदार भाजपमध्ये दाखल झाला होता आणि अलीकडंच मणिपूरमधील 7 पैकी 5 आमदार भाजपमध्ये दाखल झाले. गेल्या आठवड्यात जनता दलच्या (युनायटेड) पाच आमदारांनी भाजप पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मणिपूर विधानसभा सचिवालयानं दिलेल्या निवेदनानुसार, के. जयकिशन सिंह, नगुरसंगलूर सनाते, मोहम्मद अचब उद्दीन, थंगजम अरुणकुमार आणि एलएम खोटे यांनी सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला.

CM Nitish Kumar vs BJP
Udayanraje Bhosale : श्रेय उदयनराजेंना जातं हे सांगताना त्यांना घशाशी येतं; खासदार शिवेंद्रराजेंवर भडकले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com