CM Nitish Kumar I मुलाने मुलाशी लग्न केलं तर कोणी जन्माला कसं येईल? - नितीश कुमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar

जर मुलींची संख्या कमी झाली तर मुले कशी जन्माला येणार?

मुलाने मुलाशी लग्न केलं तर कोणी जन्माला कसं येईल? - नितीश कुमार

पाटणा येथील मगध महिला महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी बिहारचे मुख्यमंत्री यांनी एक वक्तव्य केलं आहे. जर एखद्या मुलाचे दुसऱ्या मुलाशी लग्न झाले तर कोणी जन्माला येईल का? जर मुलींची संख्या कमी झाली तर मुले कशी जन्माला येणार. मुलांची लग्ने कशी होणार?, असे सवाल उपस्थित करत त्यांनी लैंगिकतेच्या विषयावर भाष्य केलं आहे. राज्यात महिलांच्या मागणीनुसार दारूंबदी केली आहे. त्याचप्रमाणे लग्नातील हुंडाबंदी होणं आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

ते म्हणाले, आईशिवाया मुलांचा जन्म कसा होईल. आईचं जन्मली नाही तर मुले कशी जन्म घेतील. लग्न केले तर मूल होते, मात्र जर हुंड्यासारख्या गोष्टींमध्ये आपण अडकून राहिलो तर मुलांची लग्ने कशी होणार? त्यामुळे या प्रथेला आपण विरोध केला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री नितीश कुमार कार्यक्रमादरम्यान त्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, आम्ही महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एकही मुलगी शिकण्यासाठी नव्हती. कुणी महिला विद्यार्थीनी महाविद्यालयात आलीच तर सगळेजण उठूण तिला पाहत असत. मात्र आता अनेक मुली मेडिकल आणि इंजिनिअरिंगसारखे उच्च शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मुली प्रगती करत आहेत.

महिलांच्या मागणीप्रमाणे बिहार राज्यात सरकारने दारूबंदी केली आहे. राज्यातील बालविवाह आणि हुंडा याबाबतही कायदे केले आणि त्या प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मागील वर्षी आणि यंदा यासंदर्भात निर्णय घेतला आहे. लग्नासाठी मुलीकडून हुंडा घेणे हे योग्य आणि कायदेशीर नाही, असेही ते म्हणाले आहेत.

Web Title: Bihar Cm Nitish Kumar Says Homosexuality Asked How Baby Will Be Born In Bihar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top