
Tejashwi Yadav News: उपमुख्यमंत्र्यांच्या घरी हालला पाळणा; नवरात्रीत झालं मुलीचं आगमन
Tejashwi Yadav News: बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ही आनंदाची बातमी त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून दिली. यानंतर तेजस्वी यादव यांनी ट्विट करत आपल्या समर्थकांना आनंदाची बातमी दिली. (bihar deputy cm tejashwi yadav become father tweets about birth of baby girl )
तेजस्वी यादव यांनी ट्विट करत आपल्या लेकिचा पहिला फोटो शेअर केला आहे. 'प्रसन्न होऊन देवाने अनमोल कन्येच्या रूपात भेट पाठवली आहे. ' अशी भावना तेजस्वी यादव यांनी कॅप्शनमध्ये व्यक्त केली आहे. तर बहिण रोहिणी आचार्य यांनीही अनेक ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.
डिसेंबर २०२१ मध्ये तेजस्वी यादव आणि राजश्री लग्नबंधनात अडकले होते पण त्यावेळी त्यांचा विवाह चर्चेचा विषय होता. तेजस्वी यादव यांनी त्यांचं लग्न अत्यंत साधेपणाने केलं. त्यांनी खूप कमी लोकांना लग्नासाठी आमंत्रित केलं होतं.
त्यांच्या विवाहाची चर्चा होण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे तेजस्वी यादव हे हिंदू धर्माचे होते मात्र त्यांच्या पत्नी या ख्रिश्चन धर्माच्या होत्या. तेजस्वी यांच्या पत्नीचं नाव एलेक्सिस उर्फ राशेल गोडिन्हो (Rachel Godinho) आहे.
लग्नानंतर त्यांचं नाव बदलण्याल आलं. राजेश्वरी यादव असं ठेवण्यात आलं. राजेश्वरी यादव यांचा जन्म हरियाणा आहे मात्र त्या अनेक वर्षांपासून दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी मध्ये राहायच्या. त्यांचे वडिल चंडीगढ येथे एका स्कूल मध्ये प्रिंसिपल होते.
तेजस्वी यादव यांच्या पत्नी एक एअर होस्टेस होत्या. तेजस्वी आणि एलेक्सिस (राजेश्वरी यादव) यांच्यात खूप चांगली मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. असं म्हणतात एलेक्सिस या ख्रिश्चन धर्माच्या असल्याने लालू प्रसाद यादव या लग्नासाठी तयार नव्हते. मात्र मुलाच्या इच्छेसमोर त्यांनी लग्नाला होकार दिला.