esakal | Bihar Election : मुख्यमंत्रिपदासाठी अर्धा डझन दावेदार
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Election : मुख्यमंत्रिपदासाठी अर्धा डझन दावेदार

सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप, विकासशील इंसान पार्टी, हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडेच धुरा सोपविली आहे. 

Bihar Election : मुख्यमंत्रिपदासाठी अर्धा डझन दावेदार

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार -सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा - बिहार  रणधुमाळीला वेग आला असून भावी मुख्यमंत्र्यांची नावे पक्षांनी जाहीर केली आहेत. असे एक-दोन नव्हे तर अर्धा डझन दावेदार आहेत. अनेक आघाड्या उतरल्याने असे यंदा प्रथमच घडले आहे.

सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजप, विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी), हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम) यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडेच धुरा सोपविली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुसरीकडे ‘एनडीए’ला आव्हान देणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीकडून तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंटने उपेंद्र कुशवाह यांची निवड केली. या आघाडीत असदुद्दीन ओवेसी यांचा ‘एमआयएम’ व मायावतींचा बहुजन समाज पक्षासह अन्य लहान पक्ष आहेत.  दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग यांनी नितीश कुमार यांच्या विरोधात आघाडी उघडली असून भाजपचे समर्थन ते करीत आहेत. त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे. महाराष्ट्रातील नेते प्रकाश आंबेडकर, चंद्रशेखर आझाद यांच्यासह अन्य छोट्या पक्षांची माजी खासदार व ‘बाहुबली’ नेते पप्पू यादव यांच्याशी आघाडी आहे. ‘जेडीयू’चे नेते विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया यांनी प्लूरल्स पक्ष स्थापन करून स्वतःला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा