esakal | शिवसेनेला बिहारमध्ये ‘तुतारीधारी मावळा’ चिन्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena

शिवसेनेला आता ‘तुतारीधारी मावळा'' हे नवे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र धनुष्यबाण हे पारंपारिक चिन्ह देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आयोगाने आपला नकार कायम ठेवला आहे. 

शिवसेनेला बिहारमध्ये ‘तुतारीधारी मावळा’ चिन्ह 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली -  बिहार विधानसभा निवडणुकीत ५० उमेदवार उभे करण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेची निवडणूक चिन्ह बदलण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. शिवसेनेला आता ‘तुतारीधारी मावळा'' हे नवे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र धनुष्यबाण हे पारंपारिक चिन्ह देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आयोगाने आपला नकार कायम ठेवला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवसेनेला आयोगाने बिहार निवडणुकीसाठी आधी बिस्कीट हे चिन्ह दिले होते. त्यावर शिवसेनेच्या बिहार शाखेने नाराजी व विरोध दर्शवून ते चिन्ह बदलण्याची मागणी केली होती. आयोगाला शिवसेनेने तुतारीधारी मावळा, धनुष्यबाण, ट्रॅक्‍टरवर बसलेला शेतकरी, बॅट, गॅस सिलिंडर या चिन्हांचे पर्याय दिले होते. धनुष्यबाण हे शिवसेनेचे देशभरात ओळखले जाणारे चिन्ह असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे होते. मात्र सत्तारूढ जेडीयूने त्याला विरोध केला होता. या चिन्हामुळे बिहारमधील मतदार संभ्रमित होतील, त्यांची दिशाभूल होईल व त्याचा परिणाम मतदानावर पडेल, असा दावा जेडीयूतर्फे करण्यात आला होता. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image