मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्यास तयार; तेजस्वी यादवांचे नितीश कुमार यांना आव्हान

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 15 October 2020

बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार सत्तेवर आले तर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही दहा लाख युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे काम प्रथम करणार आहोत. या नोकऱ्या सरकारी व कायमस्वरूपी असतील.

पाटणा -  ‘‘मी राघोपूरमधून उमेदवारी अर्ज भरणार असलो तरी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नालंदामधील कोणत्याही मतदारसंघातून उमदेवारी घोषित केली तर मीही तेथून उभा राहीन,’’ असे आव्हान राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्यांना बुधवारी दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तेजस्वी यांनी आज राघोपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी आई राबडीदेवी व मोठा भाऊ तेजप्रताप यादव यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले. तेजस्वी म्हणाले की, राघोपूरमधील जनतेने आम्हाला नेहमीच साथ दिली आहे. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार सत्तेवर आले तर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही दहा लाख युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे काम प्रथम करणार आहोत. या नोकऱ्या सरकारी व कायमस्वरूपी असतील. शिक्षकांचा समान काम, समान वेतनाचा प्रलंबित प्रश्‍नही सोडविण्याचे आश्‍वासन मी देत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संयुक्त जनता दलाचे एकेकाळचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही (एनडीए)चे संयोजक आणि आता लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी राज राव यांनी आज दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या मधेपूरमधील बिहारीगंज मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election 2020 Tejaswi Yadav challenges Nitish Kumar