
Bihar Election
esakal
बिहार विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम आता जोरात सुरू आहे. मात्र, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये अंतर्गत कलहाने वादल निर्माण झालं आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) नाराज आहेत, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) यांच्यातही तणाव वाढला आहे. हे सर्व चर्चा दिल्लीपर्यंत पोहोचली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे. बिहार येथील अस्थिरता राष्ट्रीय राजकारणावर परिणाम करू शकते.