esakal | Bihar Election:भाजप नितीश कुमारांवर विश्वास ठेवू शकते का?
sakal

बोलून बातमी शोधा

modi_20nitishkumar_20main

राज्यात विधानसभेच्या तब्बल 243 जागा असून प्रामुख्याने तीन पक्षांमध्ये चुरशीची लढत होत असते.

Bihar Election:भाजप नितीश कुमारांवर विश्वास ठेवू शकते का?

sakal_logo
By
प्रणव जलान

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुका नेहमीच आकर्षनाचा केंद्रबिंदू राहिल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या तब्बल 243 जागा असून प्रामुख्याने तीन पक्षांमध्ये चुरशीची लढत होत असते. मुख्यमंत्री नितीश कुमार हे प्रभावशाली नेते राहिले आहेत आणि त्यांनी बिहारमधील राजकारणाला एक वेगळे आयाम दिले आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात बिहारच्या लोकांचा विश्वास कमावला आहे. 

गेल्या 15 वर्षामध्ये बिहारच्या राजकारणात जनता दल संयुक्तचा Janata Dal (United) (JDU) वरदहस्त राहिला आहे.  2005 मध्ये जेडीयू भाजपसोबत सत्तेत होती. राष्ट्रीय जनता दल RJD सोबत मिळून 2015 मध्ये जेडीयू सत्तेत आली होती. यावरुन दिसून येईल की, तीन पक्षापैकी कोणतेही दोन पक्ष एकत्र आल्यास सरकार स्थापन करतील. पण मेख अशी आहे की, भाजप आणि आरजेडी एकत्र येऊ शकत नाहीत.

भाजप-आरजेडी का एकत्र येणार नाहीत?

दोन्ही पक्षांची वेगवेगळी वोटबँक आहे. कथित उच्च जातीचे लोक आरजेडी भाजपसोबत गेलेले कधीही स्वीकारणार नाहीत. आणि आरजेडी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास लालूंचा पक्ष मुस्लीमांचा विश्वास गमावू शकतो. त्यामुळे भाजप आणि आरजेडी एकत्र येण्याचा धोका पत्करणार नाहीत. अशा परिस्थितीत नितीश कुमारांची जेडीयू एका महत्वाच्या भूमिकेत येते. नितीश कुमारांकडे भाजप किंवा आरजेडी यापैकी कोणासोबतही जाण्याचा पर्याय आहे. 

जगभरात कोरोनाची दुसरी लाट! युरोप व अमेरिकेत पुन्हा निर्बंध

भाजपला नितीश कुमारांवर विश्वास आहे का?

याचं उत्तर हो आणि नाही, असं द्यावं लागेल. हो, कारण 2005 पासून भाजप आणि जेडीयू यांची आघाडी आहे. नाही, कारण नितीश कुमार कोणासोबतही जाऊ शकतात. नितीश कुमार भाजपसोबत असले तरी त्यांचा अजेंडा त्यांनी पूर्णपणे स्वीकारलेला नाही. त्यांनी स्वत:चाच अजेंडा पुढे चालवलेला आहे. शिवाय त्यांनी भाजपपेक्षा एक अधिक जागा मिळवून राज्यात आपण मोठे भाऊ असल्याचं दाखवून दिलं आहे. मात्र, भाजपने सोबतच्या छोट्या सहयोगी पक्षांना जास्त जागा मागण्यासाठी प्रोत्साहित करत नितीश कुमारांना चेकमेट करण्याचा प्रयत्न केला आहे. 

राम विलास पासवान यांच्या निधनानंतर, लोक जनशक्ती पार्टीची धुरा चिराग पासवान यांच्या खांद्यावर आली आहे. चिराग यांनी कायम नितीश कुमारांवर टीका केली आहे. पण, त्यांनी चुकूनही भाजपविरोधात वक्तव्य केलं नाही. त्यांनी एनडीएच्या बाहेरुन निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतलाय. तसेच त्यांनी भाजपविरोधात उमेदवार उभे करणार नसल्याचे म्हटलं आहे. 

जेडीयूने सरकार स्थापनेसाठी आपल्यावर अवलंबून रहावे अशी भाजपची इच्छा आहे. तसेच जेडीयू लालूंच्या आरजेडीसोबत जाऊ नये यासाठीही भाजपला प्रयत्न करावे लागणार आहेत. याच कसरतीतून जेडीयू 122 तर भाजप 121 जागांवर निवडणूक लढवत आहे. 

जेडीयू आरजेडीसोबत जाईल का?

जेडीयू आणि बीजेपी या दोघांना एकमेकांची गरज आहे. जेडीयूला केंद्र सरकारची मदत हवी आहे, तर भाजपला बिहारमध्ये सत्ता स्थापन करायची आहे. असं असले तरी जेडीयू आणि आरजेडी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

(EDITED BY- KARTIK PUJARI)