esakal | Bihar Election- बिहारमध्ये सायंकाळी पाचपर्यंत 51 टक्के मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

bihar

Bihar Election 2020 - भाजप नेते नित्यानंद राय यांनी करनपुरा येथील बूथवर जाऊन मतदान केलं आहे.

Bihar Election- बिहारमध्ये सायंकाळी पाचपर्यंत 51 टक्के मतदान

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पाटणा Bihar Election 2020 - बिहार विधानसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. यापुर्वी पहिल्या टप्प्यासाठी 55 टक्के मतदान झाले होते. राज्याच्या एकूण 243 पैकी 71 मतदारसंघांमध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे 42, संयुक्त जनता दलाचे 35 आणि भाजपचे 29 उमेदवार रिंगणात होते.

आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात 17 जिल्ह्यातील 94 जागांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामध्ये जवळपास 2.85 कोटी मतदार विधानसभेच्या रिंगणात असलेल्या 1463 उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत. यामध्ये महाआघाडीचे उमेदवार तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव सोबत एनडीएमधील चार मंत्र्यांचं भविष्य मतपेटीत कैद होणार आहे.

Live Updates-

-बिहारमध्ये सायंकाळी पाचपर्यंत 51 टक्के मतदान झाले आहे. राज्यात 94 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

-नितीश कुमार यांच्या प्रचारसभेत कांदे फेकल्याची घटना समोर आली आहे.  

-निवडणूक आयोगाने कोरोनाच्या धर्तीवर सर्व उपाययोजना केल्याची माहिती वरिष्ठ आधिकाऱ्याने दिली आहे. 

-लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी खगेरिया येथे जाऊन मतदान केले आहे.

-दुसऱ्या टप्प्यातील 94 जागांसाठी होत असलेल्या मतदानावेळी सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळले जात आहेत.

- तेजस्वी यादव आणि राबडीदेवी मतदानासाठी बूथवर आले आहेत. यावेळेेस माध्यमांशी बोलताना राबडीदेवी म्हणाल्या की, सध्या बिहारला बदल आणि विकास गरजेचा आहे.

- बूथवर ठिकठिकाणी वृध्दांसाठी योग्य उपाययोजना केलेल्या आहेत. निवडणूक कर्मचारी वृध्दाना मदत करताना दिसत आहेत.

-राजद नेते तेजप्रताप यादव हसनपूर विधानसभा मतदारसंधातून निवडणूक लढवत आहेत. यावेळेस बोलताना त्यांनी सांगितले की, बिहारच्या जनतेला बदल हवा आहे.' पुढे बोलताना त्यांनी बिहारच्या जनतेला मतदान करण्याचे आवाहनही केले.

-बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार यांनीही पाटनामधील राजेंद्रनगर भागातील 49 नंबरच्या पोलिंग बूथ मतदानाचा हक्क बजावला आहे. 

- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

-भाजप नेते नित्यानंद राय यांनी करनपुरा येथील बूथवर जाऊन मतदान केलं आहे. हा भाग हाजीपुरा विधानसभा मतदारसंघात येतो.

- नेपाळच्या बॉर्डरलगत असलेल्या भागातील विधानसभा मतदारसंघात Indo-Tibetan Border Police (ITBP) चे जवान अपंग मतदारांना बूथपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करत आहेत.

- सध्या बिहारमध्ये बदलाची चाहूल लागली आहे आणि बिहारी जनता बदल करणार आहे, असा विश्वास काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. तसेच सिन्हा यांनी चिरंजिव लव चा विजय नक्की असल्याचेही सांगितले. सिन्हा पुत्र लव हे बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

loading image
go to top