esakal | नितीश कुमारांना निवडणूक लढवण्याची वाटते भीती? शेवटचं कधी जिंकले होते
sakal

बोलून बातमी शोधा

nitish-kumar.jpg

नितीश कुमार जर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असतील तर ते मागच्या दरवाजानेच होतील.

नितीश कुमारांना निवडणूक लढवण्याची वाटते भीती? शेवटचं कधी जिंकले होते

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आरोप लावलाय की, नितीश कुमार हरण्याच्या भीतीने निवडणूक लढवत नाहीत. नितीश कुमार जर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असतील तर ते मागच्या दरवाजानेच होतील. नितीश कुमार 2018 मध्ये विधानपरिषदेचे सदस्य बनले होते. त्यांचा कार्यकाळ 2024 पर्यंतचा आहे. त्यामुळे निवडणूक न लढवताच नितीश कुमार सहजपणे मुख्यमंत्री होऊ शकतात. जर ते मुख्यमंत्री बनले तर त्यांचा कार्यकाळ 2025 पर्यंतचा असेल. त्यामुळे त्यांना 2024 मध्ये पुन्हा विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य व्हावे लागेल. 

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाचं करण जोहर कनेक्शन? धर्मा प्रोडक्शनच्या एकास अटक

नितीन कुमार सलग तीन वेळा मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. एक मुख्यमंत्री थेट जनतेने निवडून दिलेला आमदार का असू नये? असा प्रश्व विचारला जात आहे. नितीश कुमार निवडणूक लढण्यास घाबरात का, असा सवाल आरजेडीने केला आहे. आरजेडीने लालू प्रसाद यादव यांचे उदाहरण दिले आहे. लालू प्रसाद यादव जोपर्यंत राजकारणात सक्रिय होते, तोपर्यंत ते विधानसभा निवडणूक लढवत होते. जेव्हा कमान राबडी देवी यांना देण्यात आली, तेव्हा त्यांनीही निवडणूक लढवण्यास नाही म्हटलं नाही. 

विधान परिषदेतील सदस्य जनतेचे प्रतिनिधी नसतात. त्यामुळे जनेतेने निवडून दिलेला उमेदवारच मुख्यमंत्री असावा, असं विरोधकांचं म्हणणं आहे. काही राजकीय तज्ज्ञांनी नितीश कुमार यांच्या बाजूने बोलताना म्हटलं की, मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातून निवडून येतो, तेथील लोकांच्या अपेक्षा खूप वाढतात. शिवाय मतदारसंघातील लोक मुख्यमंत्र्यांकडे आपल्या अडचणी घेऊन येतात. अशावेळी मुख्यमंत्र्यांचा खूप वेळ या कामात जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा स्वत:चा असा मतदारसंघ नसणे सोयीस्कर आहे. 

कोरोना लस : 80 हजार कोटी उपलब्ध होतील का? आदर पुनावालांचा प्रश्न

पहिल्या विधानसभा निवडणुकीत पराभव

नितीश कुमार यांनी 2004 साली लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवलेली नाही. ते नालंदा येथून लोकसभा जिंकले होते. याआधी ते पाचवेळा लोकसभा सदस्य राहिले आहेत. बिहार विधानसभेत त्यांनी 1985 साली प्रवेश केला होता, 1989 पर्यंत सदस्य राहिल्यानंतर ते लोकसभेसाठी निवडले गेले.  नितीश कुमार यांनी पहिली विधानसभा निवडून 1977 साली जनता पार्टीच्या तिकीटावर लढवली होती. मात्र, या निवडणूक त्यांचा पराभव झाला होता. 

(edited by- kartik pujari)