esakal | Bihar Election:बिहार निवडणुकीत नेपोटिझम; नेत्यांकडून कुटुंबीयांना उमेदवारीची खिरापत
sakal

बोलून बातमी शोधा

bihar.jpg

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी नातेसंबंध जपले असल्याचे दिसून येते.

Bihar Election:बिहार निवडणुकीत नेपोटिझम; नेत्यांकडून कुटुंबीयांना उमेदवारीची खिरापत

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार

पाटणा- बिहारमधील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी नातेसंबंध जपले असल्याचे दिसून येते. दोन टप्प्यांतील निवडणुकीसाठी बहुतेक पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून त्यात आई व मुलगा, भावंडं, सासरे व जावई, दीर- भावजय, व्याही-विहिण आदी नात्यातील लोकांना तिकीट दिले आहे. काही मतदारसंघात ही मंडळी एकमेकांविरोधात तर काही ठिकाणी वेगवेगळ्या मतदारसंघातून ते उभे आहेत.

माजी खासदार आनंद मोहन यांची पत्नी लव्हली आनंद सहरसा मतदारसंघातून राष्‍ट्रीय जनता दलाकडून (आरजेडी) रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे पुत्र चेतन आनंद शिवहरमध्ये ‘आरजेडी’च्या तिकिटावर प्रथमच निवडणूक लढत आहेत. निवडणूक रिंगणात ‘आरजेडी’चे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच पुत्र तेजप्रताप व तेजस्वी यादव हे दोघेही आखाड्यात उतरलेले आहेत. तेजप्रताप यादव हे हसनपूरमधून उभे आहेत, तर तेजस्वी यांना राघोपूरमधून उभे राहण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही मतदारसंघात दुसऱ्या फेरीत मतदान होणार आहे.

चीनला लगाम घालू शकणारी 'क्वाड'; सहकार्याचा नवा चतुष्कोन

निवडणुकीत सासरे व जावयांच्या तीन जोड्याही लढत आहेत. यात सर्वांत लक्षवेधी जोडी म्हणजे तेजप्रताप यादव व त्‍यांचे सासरे चंद्रिका राय यांची आहे. चंद्रिका राय संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) तिकिटावर सारण जिल्ह्यातील परसा मतदारसंघातून लढत आहेत. दुसरी जोडी बिहारचे माजी मुख्यमंत्री व हिंदुस्थान अवामी मोर्चाचे (हम) अध्यक्ष जीतनराम मांझी आणि त्यांचे जावई देवेंद्र मांझी यांची आहे. ते दोघे अनुक्रमे इमामगंज आणि मखदुमपूर या सुरक्षित मतदारसंघातून उभे आहेत. जीतनराम मांझी यांच्या विहिण ज्योतीदेवी या ‘हम’कडून बाराचट्टीमधून लढणार आहेत. ‘जेडीयू’चे ज्येष्ठ नेते व मंत्री नरेंद्र नारायण यादव व त्यांचे जावई निखिल मंडल हेही रिंगणात आहेत.

व्याही, दीर- भावजय विरोधात

दोन व्याहीही निवडणूक आखाड्यात एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. भाजपने सिवान मतदारसंघात माजी खासदार ओमप्रकाश यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात ‘आरजेडी’ने येथून अवध बिहारी चौधरी यांना तिकीट दिले आहे. यादव व चौधरी नात्याने व्याही आहेत. भोजपूर जिल्ह्यातील संदेशमध्ये ‘जेडीयू’चे उमेदवार विजेंद्र यादव आहेत. त्यांना भावजय किरणदेवी यांनी ‘आरजेडी’कडून आव्हान आहे. या मतदारसंघातील ‘आरजेडी’चे आमदार अरुण यादव यांच्या किरणदेवी पत्नी आहेत. बलात्काराच्या प्रकरणात पोलिस अरुण यादव यांचा शोध घेत आहे.