आता कंदिलाचे काम संपले; बिहारच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘राजद’ला टोला

उज्ज्वकुमार - सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 24 October 2020

मोदी म्हणाले, मागील तीन ते चार वर्षांपासून आपण जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यासोबत काम करत आहोत. त्यांच्या कारकिर्दीमध्येच राज्यात विकासाची कामे वेगाने झाली.

गया (बिहार) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये पहिल्यांदाच रणशिंग फुंकत विरोधकांवर निशाणा साधला. राष्ट्रीय जनता दलाच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत राज्यामध्ये गुन्हेगारी आणि लूटमारीचे प्रकार वाढले होते.  आता हीच मंडळी काश्‍मीरमध्ये ३७० वे कलम पुन्हा लागू करण्यात यावेत अशी मागणी करत असून त्यांची येथे मते मागण्याची हिंमतच कशी  होते,  असा सवाल मोदी यांनी केला. राज्यात आता वीज आली असून कंदिलाचे काम संपले आहे, असा टोलाही त्यांनी राजदला लगावला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी म्हणाले, ‘‘ मागील तीन ते चार वर्षांपासून आपण जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यासोबत काम करत आहोत. त्यांच्या कारकिर्दीमध्येच राज्यात विकासाची कामे वेगाने झाली. नितीशकुमार २०१७ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आले. गलवान खोऱ्यामध्ये चिनी सैनिकांविरोधात दोन हात करणारे देखील बिहारमधील जवानच होते.  काही मंडळी काश्‍मीरमध्ये पुन्हा ३७० वे कलम लागू करण्याची भाषा करत आहेत. अशी भाषा करणारी मंडळी आता बिहारमध्ये मते मागत आहेत. सीमेवर बलिदान देणाऱ्या येथील भूमिपुत्रांचा ही मंडळी अवमान करत आहेत.’ पंतप्रधान मोदी यांच्या आज बिहारमध्ये तीन ठिकाणी प्रचारसभा झाल्या. यामध्ये सासाराम, गया आणि भागलपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकांनी यंदा सणासुदीच्या काळामध्ये खरेदी करताना स्थानिक मंडळींनी तयार केलेले साहित्यच खरेदी करावे. मातीपासून तयार करण्यात आलेल्या शिल्पाकृती, मातीची भांडी आणि पणत्या यांची खरेदी करण्यात यावी. आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर बिहार आणि भारत आत्मनिर्भर होईल. 
नरेंद्र मोदी, भागलपूर येथील सभेत 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी म्हणाले
विरोधक देश कमकुवत करत आहेत
विकासासाठी सक्रिय 
राज्यातील सरकार हे डबल इंजिनचे आहे
केंद्रातील काँग्रेसने राज्याचा विकास रोखला
केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हितासाठी
विरोधक मध्यस्थांची भाषा बोलत आहेत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election Prime Minister Narendra Modi RJD