Bihar Election:भाजपच्या आश्वासनावर, राहुल गांधींचा जबरदस्त टोला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची रंगत वाढली असून आता विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याशिवाय राजकीय पक्षांकडून जनेतला आश्वासनांची खैरातही करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली - बिहारमध्ये निवडणूक (Bihar Election 2020) प्रचाराची रंगत वाढली असून आता विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याशिवाय राजकीय पक्षांकडून जनेतला आश्वासनांची खैरातही करण्यात येत आहे. यातच भाजपने (BJP) त्यांच्या जाहीरनाम्यात फ्री कोरोना व्हॅक्सिन देण्याचं आश्वासन दिलं आहे. यानंतर इतर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. आता या आश्वासनावरून निवडणूक आयोगाकडे  (Election Commission India) धाव घेतली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही जोरदार निषाणा साधला आहे. राहुल गांधींशिवाय इतर नेत्यांनीही याविरोधात प्रश्न उपस्थित केला असून निवडणूक आयोगाकडे अर्थ मंत्र्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

राहुल गांधींनी ट्विटररून हल्लाबोल केला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, भारत सरकारने कोरोना व्हॅक्सिनच्या वितरणाची घोषणा केली आहे. आता हे व्हॅक्सिन आणि खोटी आश्वासने तुम्हाला कधी मिळणार हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या निवडणुका कधी आहेत ते पाहा असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे.

भाजपने बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. यामध्ये व्हॅक्सिन देण्याच्या आश्वासनावरून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हलं की, तुम मुझे वोट दो मै तुम्हे व्हॅक्सिन दूंगा, लोकांच्या मनात भीती निर्माण करणारी ही कसली निती. निवडणूक आयोग यांना आणि यांच्या लटकलेल्या सरकारला इशारा देणार का असंही थरुर यांनी विचारलं आहे.

बिहरमधील काँग्रेस पक्षाचे निवडणूक प्रचार प्रभारी असलेल्या रणदीप सुरजेवाला यांनीही मोफत व्हॅक्सिनच्या मुद्द्यावरून भाजपला धारेवर धरलं आहे. भाजपनं दिलेलं मोफत व्हॅक्सिनचं आश्वासन म्हणजे बिहारच्या जनतेचा अपमान आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधून केलेल्या भाषणात सांगितलं होतं की, व्हॅक्सिन येण्यास आणखी एक वर्ष लागेल. मात्र इकडे बिहारमधील त्यांचे नेते जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाला माहिती आहे की बिहारमध्ये कोरोनाच्या साथीमध्ये काय झालं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election rahul gandhi tweet congress question over bjp promise free covid vaccine