esakal | Bihar Election: भाजपचे 5 डावपेच ठरले यशस्वी; JDUला टाकले मागे
sakal

बोलून बातमी शोधा

NARENDRA MODI

बिहार विधानसभा निवडणुकीच्या सध्याच्या कलांनुसार एनडीए आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

Bihar Election: भाजपचे 5 डावपेच ठरले यशस्वी; JDUला टाकले मागे

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- Bihar Election Results 2020 बिहार विधानसभा निवडणुकीच्या सध्याच्या कलांनुसार एनडीए आघाडीवर असल्याचं दिसत आहे.  भाजप 73 जागांवर आघाडीवर असून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची कोणती रणनिती किंवा आश्वासने यशस्वी ठरले हे आपण बघुया...

19 लाख रोजगार आणि जॉबचा दावा?

आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी 10 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन प्रचारादरम्यान दिले होते. त्यामुळे राज्यातील तरुणवर्ग तेजस्वी यादव यांच्याकडे ओढला जाईल, असं वाटत होतं. पण, उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी आणखी पुढे जात 19 लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिले. यातील 4 लाख नोकऱ्या आणि 15 लाख स्वयंरोजगार देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. 

लालू कुटुंबीयांवर थेट वार?

पंतप्रधान मोदी भाजपचे स्टार प्रचारक राहिले. मोदींनी शेवटच्या टप्प्यात प्रचारादरम्यान आक्रमकपणा दाखवला. मोदींनी आपल्या सभेमध्ये 15 वर्षांच्या लालू-राबडी शासनकाळाची आठवण करुन दिली. त्यानंतर त्यांनी तेजस्वी यादव यांचा उल्लेख जंगलराज का युवराज असा केला. राजदची सत्ता आल्यास पुन्हा राज्यातील कायदा-व्यवस्था बिघडेल अशी भीती त्यामुळे जनतेमध्ये निर्माण झाली. 

Bihar Election: बिहारमध्ये आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही; शरद पवारांचा टोला

चिराग यांचा केला वापर

लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांनी भाजपवर टीका न करण्याची घेतलेली भूमिका आणि अनेक भाजपच्या बंडखोरांना दिलेली संधी यामुळे भाजपला फायदा झाला. लोजपानं भाजपविरोधात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे चिराग यांनी जेडीयूविरोधात उमेदवार उभे केले. त्याठिकाणी जेडीयूला मोठा फटका बसला. 

ओबीसी, दलित आणि महिलांच्या मतांवर फोकस

भाजपने परंपरागत वोटबँक खेरीज ओबीसी, दलित आणि महिलांवर विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा त्यांना जास्त मतं मिळाल्याचं दिसतंय.

हिंदूवाद आणि राष्ट्रावादाचे कार्ड

तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपने सीमांचल भागावर जोर दिला. पंतप्रधान मोदींनी शेवटच्या टप्प्यातील निवडणूक रॅलींमध्ये हिंदूत्व आणि राष्ट्रवादाचे कार्ड खेळले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रचारादरम्यान हिंदूत्वाच्या मुद्द्याला हात घातला.