esakal | 'नितीश कुमार थकल्याने राज्य चालविणे कठीण’ 
sakal

बोलून बातमी शोधा

Tejashwi-Yadav

आम्ही आश्‍वासनांचे पालन करू. आम्ही सरकार स्थापन करू. बिहारची जनता आम्हाला विजयी करेल, अशा आम्हाला विश्‍वास आहे, असेही ते म्हणाले. 

'नितीश कुमार थकल्याने राज्य चालविणे कठीण’ 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा - ‘‘बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे थकले असून राज्य चालविणे त्यांना शक्य होत नाही,’’ अशी टीका राष्ट्रीय जनता दला (आरजेडी)चे नेचे तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य सुविधा यावरून नितीश कुमार यांच्यावर निशाना साधत तेजस्वी म्हणाले की, नितीश कुमार हे थकले आहेत. त्यांना राज्य चालविता येत नाही. विकास, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि गरिबी या विषयांवर बोलणे ते टाळत आहेत. बिहार हे जमिनीने वेढलेले राज्य असल्याने येथे औद्योगीकरण शक्य नाही. यामुळे रोजगार निर्मितीही होऊ शकत नाही, असे कुमार यांचे म्हणणे आहे. आम्ही आश्‍वासनांचे पालन करू. आम्ही सरकार स्थापन करू. बिहारची जनता आम्हाला विजयी करेल, अशा आम्हाला विश्‍वास आहे, असेही ते म्हणाले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा