गया (बिहार) : बिहारमधील गया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे सामूहिक बलात्कार पीडितेच्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला (Doctor) गावातील गुंडांनी झाडाला बांधून बेदम मारहाण केलीये. पीडितेच्या कुटुंबावर खटला मागे घेण्याचा दबाव आणण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप आहे.