Subhash Singh : भाजप आमदार सुभाष सिंह यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

सुभाष सिंह हे भाजपच्या तिकीटावर सलग चार वेळा गोपालगंज मतदारसंघमधून आमदार राहिले आहेत.
Subhash Singh
Subhash Singhesakal
Summary

सुभाष सिंह हे भाजपच्या तिकीटावर सलग चार वेळा गोपालगंज मतदारसंघमधून आमदार राहिले आहेत.

गोपालगंज : बिहार सरकारमधील (Bihar Government) माजी सहकार मंत्री आणि गोपालगंज मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले सुभाष सिंह (Subhash Singh) यांचं दिल्ली एम्समध्ये (Delhi AIIMS) निधन झालं. भाजप आमदाराचं (BJP MLA) आज (मंगळवार) पहाटे 4 वाजता दिल्लीच्या एम्समध्ये निधन झालंय. सुभाष सिंह दीर्घकाळ आजारी होते आणि किडनी प्रत्यारोपणानंतर त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

ख्वाजेपूर गावचे रहिवासी असलेले सुभाष सिंह हे भाजपच्या तिकीटावर सलग चार वेळा गोपालगंज मतदारसंघमधून आमदार होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, किडनी प्रत्यारोपणानंतर त्यांना गोपालगंज (Gopalganj) येथील घरी आणण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुन्हा दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं. सुभाष सिंह यांचा राजकीय प्रवास 1990 च्या दशकात सुरू झाला. त्यानंतर ते गोपालगंजच्या युनियनचे अध्यक्ष होते. यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रात काम केलं.

एनडीए सरकारमध्ये सहकारमंत्री

सुभाष सिंह यांची लोकप्रियता पाहून भाजपनं गोपाळगंज मतदारसंघमधून विधानसभेचं आमदारकीचं तिकीट दिलं. 2005, 2010, 2015 आणि 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) ते सतत आमदार म्हणून निवडून आले. सलग चार वेळा आमदार राहिल्यानंतर एनडीए सरकारमध्ये त्यांना सहकारमंत्री करण्यात आलं.

Subhash Singh
Telangana : तिरंगा फडकवल्यानंतर काही मिनिटांतच TRS नेत्याची हत्या

वडिलोपार्जित गावात करण्यात येणार अंत्यसंस्कार

सहकार मंत्री झाल्यापासून ते सतत आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते. गोपालगंज भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंह यांनी सांगितलं की, भाजप आमदाराचं आज पहाटे ४ वाजता दिल्लीच्या एम्समध्ये निधन झालं. विशेष विमानानं त्यांचं पार्थिव पाटणा इथं आणण्यात येणार आहे. यानंतर गोपाळगंजमधील ख्वाजेपूर या वडिलोपार्जित गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Subhash Singh
Shivamogga Violence : सावरकरांच्या पोस्टर वादाप्रकरणी चौघांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com