Statement On Liquor Ban : बिहारच्या सत्ताधारी आमदाराचे दारुबंदीबाबत वादग्रस्त विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Statement On Liquor Ban

Statement On Liquor Ban : बिहारच्या सत्ताधारी आमदाराचे दारुबंदीबाबत वादग्रस्त विधान

पाटणा : बिहार मधील दारू बंदीवरून नीतिश सरकारवर त्याच्याच सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) विधान परिषदेतील आमदार रामबली चंद्रवंशी यांनी जोरदार टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, ‘बिहारमध्ये दारू ही देवा सारखी आहे. दिसत कुठेच नाही पण आहे मात्र सर्वत्र’ असे विधान केले. अशी दारू बंदी काय उपयोगाची असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बिहारमध्ये दारू बंदीवरून नीतिश सरकारला सातत्याने टीकेला देखील सामोरे जावे लागत आहे. उपमुख्यमंत्री आणि आरजेडीचे नेते तेजस्वी याद यांनी देखील सरकारमध्ये सहभागी होण्याआधी नीतिश यांच्यावर टीका केली होती. तसेच नीतिश आणि जीतनराम मांझी यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या भाकपा(मा-ले)ने देखील अंमलबजावणीचा फेरआढावा घेण्यास अनुकूलता दर्शवली होती.

नीतिश यांचीही कबुली

नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात नीतिश यांनी देखील बिहारमध्ये दारू बंदीच्या अंमलबजावणी बाबत भाष्य करत, पाटण्यात दारू बंदीची अंमलबजावणी नीट झाल्यास उर्वरित राज्यात देखील त्याची अंमलबजीवणी नीट होऊ शकते असे विधान करत, अंमलबजावणी नीट होत नसल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल केले होते.