Video : पोलिस अधिकाऱ्याने ओळखले नाही म्हणून मंत्र्याने...

वृत्तसंस्था
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

- मंत्री आणि व्हीआयपींना दिली जाते विशेष वागणूक.

नवी दिल्ली : मंत्री आणि व्हीआयपींना विशेष वागणूक दिली जाते. हे सर्वांना माहिती असेलच. मात्र, कधीतरी पोलिसांकडून चुकूनही काही कमतरता राहिली तर संबंधित पोलिसाला चांगलेच धारेवर धरले जाते. असाच प्रकार बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे यांच्याबाबत घडला. त्यांनी थेट त्या पोलिसाला निलंबित करण्याची मागणी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगल पांडे हे बिहारच्या सिवान येथे रुग्णालयाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. त्यातच हा गोंधळ उडाला. एक पोलिस अधिकारी मंगल पांडे यांना ओळखू शकला नाही. अधिकाऱ्याने त्यांच्याकडे पाहून चौकशी करण्याचा विचार केला तो चौकशी करणार होता.

तत्पूर्वी त्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने परिस्थिती हाताळली. त्यामुळे मंत्री पांडे यांची चौकशी झाली नाही. मात्र, हा प्रकार पाहून मंत्रिमहोदयांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी थेट त्या पोलिस अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणीच केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Health Minister Mangal Pandey asks for suspension of a police officer who fails to recognise the minister

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: