

bihar news
esakal
बिहारच्या अररिया जिल्ह्यात मानवी तस्करीची एक विदारक घटना उजेडात आली आहे. यात ५५ वर्षांच्या महिलेला तिच्या मुलाला १३ वर्षांनंतर भेटण्याची संधी मिळाली. या भेटीत दुःख, लढाई आणि न्याय मिळवण्यासाठी केलेला प्रदीर्घ प्रयत्न दिसून आला. पीडित आई जरीना खातून यांनी सांगितले की, २०१२ साली त्यांचा मुलगा जमशेद उर्फ मुन्ना तस्करांच्या जाळ्यात सापडला होता.