Bihar Lizard Smuggling : आश्चर्य!! बिहारमध्ये पकडली 2 कोटींची पाल, नेपाळमधून तस्करी करण्याचा होता बेत

बिहारमधील पूर्णिया येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुर्मिळ प्रजातीची पाल जप्त
Bihar Lizard Smuggling
Bihar Lizard Smugglingesakal

Bihar Lizard Smuggling : बिहारमधील पूर्णिया येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दुर्मिळ प्रजातीची पाल जप्त करण्यात आली आहे. टाके गायको अस या प्रजातीच नाव आहे. या प्रजातीच्या पालीची किंमत दोन कोटी रुपये आहे. बिहार पोलिसांनी बैसी येथील एका दुकानात टाकलेल्या छाप्यात ही पाल जप्त केली आहे.

Bihar Lizard Smuggling
Home Lizard: घरातून पाली कशा पळवायच्या? जाणून घ्या सोप्या टिप्स

हे तस्कर नेपाळमार्गे परदेशात पाठवण्याच्या प्रयत्नात होते, असे सांगण्यात येत आहे. पण त्या आधीच पोलिसांनी त्यांना पकडल. जप्त केलेली पाल अनेक औषधे बनवण्यासाठी वापरली जाऊ शकते. याआधीही पूर्णियाच्या बैसी येथील चेकपोस्टवर दुर्मिळ प्रजातीची पाल सापडली होती. दुर्मिळ प्रजातीची ही पाल पश्चिम बंगाल आणि केरळच्या घनदाट जंगलात आढळते.

Bihar Lizard Smuggling
Poli Ladu Recipe : शिळ्या पोळ्या उरल्या आहेत? मग बनवा खास गुळाचा लाडोबा

या पालीसोबत पूर्णिया पोलिसांनी पाच जणांनाही अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी औषध दुकानातून ही पाल जप्त केली आहे. "ताज मेडिकल" असे या औषधांच्या दुकानाचे नाव आहे. या माणसांपैकी शेख गरीबूल आणि मोहन लाल सरकार हे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.टाके गायको जातीची काळी पाल सापडली.

Bihar Lizard Smuggling
Break Fast Recipe : नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी अन् चटपटीत इडली चाट

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णिया जिल्ह्यातील बैसी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा एका औषध दुकानातून कोडीन आणि टोके गायको जातीच्या काळ्या पालीचे ५० पॅकेट जप्त केले आहेत. या पालीची किंमत सुमारे दीड कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे काही लोक त्याची किंमत दोन कोटी रुपये असल्याचेही सांगत आहेत. टोके गेको पाल ही नशीब आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. यासोबतच औषध बनवायलाही कामात येते.

Bihar Lizard Smuggling
Winter Season Food : थंडीचा महिना...गरम अन् पौष्टिक आहार खा!

प्रतिबंधित कफ सिरपच्या 600 बाटल्या जप्त

पोलिसांनी जप्त केलेली पाल वनविभागाच्या ताब्यात दिली. या प्रकरणी बियासीचे डीएसपी आदित्य कुमार यांनी सांगितले की, औषधांच्या दुकानात दुर्मिळ प्रजातीची पाल असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. यानंतर तिथे छापा टाकला असता पाल आणि प्रतिबंधित कोडीन कफ सिरपच्या 600 बाटल्या जप्त करण्यात आल्या. यानंतर पोलिसांनी मोहम्मद जाफर, मोहम्मद अरसाद आलम आणि दुकान मालक मोहम्मद दिलनवाज यांना कफ सिरप सोबत अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com